वर्ष २०२४ च्या मकरसंक्रातीला श्रीराममंदिर भाविकांसाठी खुले करणार !

अयोध्येतील भव्य श्रीराममंदिरासाठी १ सहस्र ८०० कोटी रुपये खर्च येणार !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील भव्य श्रीराममंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर चालू आहे. ‘वर्ष २०२४ च्या मकरसंक्रातीला मंदिर हिंदूंसाठी उघडले जाईल’, असे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे. ‘या मंदिरासाठी सुमारे १ सहस्र ८०० कोटी रुपयांचा खर्च येईल’, असेही ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी मंदिर बांधण्यासाठी १ सहस्र १०० कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

श्रीराममंदिरासह या परिसरात महर्षि वाल्मीकि, वसिष्ठ, विश्‍वामित्र, अगस्त्य, तसेच निषादराज, शबरी आणि जटायू यांची मंदिरेही बांधण्यात येणार आहेत. मंदिराचे सर्व दरवाजे सागवान लाकडापासून बनवले जातील, असा निर्णय ट्रस्टच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला.