इम्रान खान यांचे विमान आपत्कालीन स्थितीत उतरवले

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना घेऊन जाणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आले. इम्रान खान एका सभेला संबोधित करण्यासाठी विशेष विमानाने गुंजरावाला येथे जात होते. उड्डाणानंतर काही  वेळातच विमानाच्या वैमानिकाने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि विमान इस्लामाबद विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात यश मिळविले. त्यानंतर इम्रान खान चारचाकी वाहनातून गुजरांवाला येथे गेले आणि त्यांनी सभेला संबोधित केले, असे वृत्त ‘डेली पाकिस्तान’ने प्रसिद्ध केले आहे.