श्रीरारामजन्मभूमीवर पूर्वी श्रीराममंदिर होते, हे उत्खननाद्वारे सिद्ध करणारे पुरातत्वज्ञ बी.बी. लाल यांचे निधन

पुरातत्वज्ञ बी.बी. लाल

नवी देहली – भारताच्या ‘आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया’चे माजी महासंचालक आणि ज्येष्ठ पुरातत्वज्ञ बी.बी. लाल यांचे १० सप्टेंबर या दिवशी निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. ‘अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर प्राचीन काळी श्रीराममंदिर होते’, हे सिद्ध करण्यात बी.बी. लाल यांनी त्या ठिकाणी केलेले उत्खनन न्यायालयात महत्त्वाचा आधार ठरले होते. बी.बी. लाल यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

बी.बी. लाल हे वर्ष १९६८ ते १९७२ या काळात आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे महासंचालक होते. हडप्पा संस्कृती आणि महाभारताशी संबंधित ठिकाणे यांच्या उत्खननासाठी त्यांनी सखोल अध्ययन केले होते. त्यांनी युनेस्कोच्या अनेक समित्यांवरही वेगवेगळे दायित्व यशस्वीरित्या पार पाडले होते.