१२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता !

मुंबई – १२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस्. होसाळीकर यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. पुढील काही घंट्यांत मुंबईसह पालघर, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि सांगली या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडतांना विशेष काळजी घ्यावी, अशी सूचना होसाळीकर यांनी दिली आहे.