५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला खोपोली, जिल्हा रायगड येथील चि. शिवेश मुकेश तेली (वय १ वर्ष) !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. शिवेश मुकेश तेली हा या पिढीतील एक आहे !

भाद्रपद कृष्ण प्रतिपदा (११.९.२०२२) या दिवशी खोपोली, (जिल्हा) रायगड येथील चि. शिवेश मुकेश तेली याचा प्रथम वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या आईला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. शिवेश तेली

चि. शिवेश मुकेश तेली याला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

(शिवेश : शिव + ईश)

१. जन्मापूर्वी

सौ. तेजस्विनी तेली

अ. ‘मी गर्भारपणाच्या कालावधीत भाव ठेवून नामजप करत होते. मी जिज्ञासूंना संपर्क करणे आणि प्रवचन करणे, अशा सेवा करत होते.

आ. मी सतत प्रार्थना करायचे, ‘गुरुदेवा, केवळ तुम्हीच माझ्या बाळाचा सांभाळ करणारे आहात.’

इ. मी पोटावर हात ठेवून श्रीकृष्णाचा श्लोक म्हणायचे. तेव्हा मला लगेच गर्भाची हालचाल जाणवायची.

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते ६ मास

२ अ १. देवाची ओढ

अ. बाळाला अंघोळ घालतांना ते रडायचे. तेव्हा मी त्याला सांगायचे, ‘‘तुला अंघोळ घालायला बिंदामाता (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) आणि अंजलीमाता (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) आल्या आहेत. तुझी अंघोळ झाल्यावर त्या तुला प.पू. आजोबांकडे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे) घेऊन जाणार आहेत. तुला रामनाथीला त्यांच्याकडे जायचे आहे ना ?’’ तेव्हा बाळाचे रडणे लगेच थांबत असे.

आ. माझी आई (सौ. मीनाबाई तात्यासाहेब नगरे) बाळाशी भावाच्या स्तरावर बोलायची. आई घरात मोठ्या आवाजात नामजप, प्रवचन आणि सत्संग लावून ठेवायची. ते तो शांतपणे ऐकायचा. माझे बाबा (श्री. तात्यासाहेब सुरेश नगरे) त्याला गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) गोष्टी सांगायचे, तसेच नामजप करायचे. तेव्हा बाळ ते शांतपणे ऐकत असे.

इ. शिवेश रडायला लागल्यास श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा पाळणा लावल्यावर तो शांत होत असे.

ई. तो ४ – ५ मासांचा असतांना मी सायंकाळी देवापुढे निरांजन लावून त्याला देवघरात घेऊन बसत असे. तेव्हा मी श्रीकृष्णाचा श्लोक म्हणतांना शिवेशही श्लोक गुणगुणत असे.

२ आ. ६ मास ते १ वर्ष

२ आ १. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करताच रडणे बंद होणे : शिवेश ६ – ७ मासांचा असतांना आम्ही त्याला देवदर्शनासाठी देवगड, शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे घेऊन गेलो होतो. तेव्हा देवगड येथे आम्ही रांगेत उभे असतांना तो फार रडत होता. आम्ही ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू करताच त्याचे रडणे बंद झाले.

२ आ २. आम्ही ‘ॐ नमः शिवाय ।’ म्हटल्यावर तो हसतो. त्याला कुणीही भेटल्यावर तो ‘ॐ नमः शिवाय ।’ म्हणतो. त्याच्या सहवासात रहाणारेही त्याचे अनुकरण करतात.

२ आ ३. सर्व जण त्याच्याकडे आकर्षित होतात.

२ आ ४. तो नेहमी आनंदी असतो. त्याच्यामुळे घरात आनंदी वातावरण असते.

३. स्वभावदोष : हट्टीपणा

४. कृतज्ञता

त्याचे हसणे, खेळणे आणि चालणे बघून ‘घरात श्रीकृष्ण जन्माला आला आहे’, याची आम्हाला गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) अनुभूती दिली. त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. तेजस्विनी मुकेश तेली (चि. शिवेशची आई), खोपोली, जिल्हा रायगड. (१९.७.२०२२)