लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ‘लेटे हुए हनुमान मंदिरा’तील मूर्तींची तौफीककडून तोडफोड

तौफीक अहमद (डावीकडे) आणि तुटलेली मूर्ती (उजवीकडे).

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील टीले वाली मशिदीजवळील ‘लेटे हुए हनुमान मंदिरा’तील २ मूर्तींची तोडफोड केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी तौफीक याला अटक केली आहे. सध्या येथे पोलिसांनी बंदोबेस्त ठेवला आहे. पोलीस अधिक चौकशी करत आहेत. या घटनेविषयी स्थानिक आमदार नीरज बोरा यांनी म्हटले की, यामागे दंगल घडवण्याचा हेतू असू शकतो.

मंदिराच्या पुजार्‍यांच्या म्हणण्यानुसार शनिदेव आणि श्री हनुमान अशा २ मूर्तींची तोडफोड करण्यात आली. येथे मंगल महोत्सव चालू असतांना एक व्यक्ती मंदिरात आली आणि तिने ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत मूर्तींची तोडफोड केली. या वेळी मंदिरात उपस्थित भाविकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या कह्यात दिले. त्याचे नाव तौफीक असल्याचे त्याने सांगितले. (मूर्ती तोडतांना ‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊन ‘मूर्ती तोडणारा हिंदूच आहे’, असे भासवण्याचा प्रयत्न तौफिककडून करण्यात आला, हे लक्षात घ्या ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या मंदिरांवर कोण आक्रमण करतात, हे जगजाहीर असतांना एकही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी तोंड उघडत नाही !
  • हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करणार्‍यांना आता फाशीची शिक्षा करण्याचाच कायदा करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने यासाठी हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन प्रयत्न केला पाहिजे !