जबलपूर (मध्यप्रदेश) – ‘द बोर्ड ऑफ एज्युकेशन चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’चे अध्यक्ष बिशप पी.सी. सिंह यांच्यावर आर्थिक अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांनी धाड टाकून १ कोटी ६५ लाख रुपयांची रोकड जप्त केली. (हिंदू धर्मांतर केल्यानंतर नाव न पालटता समाजात वावरून लोकांची एक प्रकारे फसवणूक करत असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) तसेच त्यांच्याकडे १८ सहस्र अमेरिकी डॉलर (१४ लाख ३५ सहस्र रुपये) हे विदेशी चलनही सापडले आहे. सध्या बिशप पी.सी. सिंह जर्मनीमध्ये आहेत. त्यांच्यावर बनावट कागदपत्रे बनवून २ कोटी ७० लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
सौजन्य : MIRROR NOW
संपादकीय भूमिकाअशा बातम्या प्रसारमाध्यमे दडपतात; मात्र हिंदूंच्या संतांवरील खोट्या आरोपांना प्रसिद्धी देण्यास पुढे असतात ! |