‘इस्लाम स्वीकारा, नाहीतर गोळी झाडेन’ : हिंदु विद्यार्थिनीवर धर्मांधाकडून दबाव

मध्यप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक प्रकरण उजेडात !

प्रतिकात्मक छायाचित्र

खांडवा (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील खांडवा येथे एका हिंदु मुलीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याची घटना समोर आली आहे. मुलगी नर्सिंग महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिच्या गावातील जांबाज मन्सूरी नावाच्या मुसलमान तरुणाने तिला ‘इस्लाम स्वीकारा, नाहीतर गोळी झाडेन’ अशी धमकी दिल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. या विद्यार्थिनीने हिंदु संघटनांच्या साहाय्याने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

दैनिक ‘भास्कर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ५ सप्टेंबर २०२२ या दिवशी मन्सूरी याने पीडित मुलीला रस्त्यावर थांबवून तिच्या डोक्यावर फुलांचा वर्षाव केला आणि तिच्याशी विवाह करण्यासाठी दबाव टाकला. तसेच तिला इस्लाम स्वीकारण्यास सांगितले. धर्मांधाने तिला बलपूर्वक दुचाकीवर बसवले आणि गाडी भरधाव वेगाने चालवली. मुलगी पुष्कळ घाबरली आणि तिने चालत्या दुचाकीवरून उडी मारली. मुलीला अशा अवस्थेत पाहून तेथे गर्दी जमली. लोकांनी आरोपी तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र तो सापडला नाही. आरोपी जांबाज गेल्या एक वर्षापासून तिचा पाठलाग करत होता. तो तिचा रस्ता अडवून विवाहासाठी दबाव टाकत असे. मुलीने ही गोष्ट तिच्या कुटुंबियांना सांगितली होती. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.