महाराष्ट्रातील काही विवाह संस्था हिंदु मुलींच्या धर्मांतरासाठी साहाय्य करतात ! – नितेश राणे, आमदार, भाजप

भाजपचे आमदार नितेश राणे

मुंबई – महाराष्ट्रातील काही विवाह संस्था हिंदु मुलींच्या धर्मांतरासाठी साहाय्य करतात. केवळ २ सहस्र रुपयांमध्ये अवैध विवाह प्रमाणपत्र देण्यात येतात, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

(सौजन्य : Saam Tv)  

नगर येथे एका अल्पवयीन हिंदु मुलीचे बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या घटनेनंतर त्यांनी वरील आरोप केला आहे. या वेळी ते म्हणाले, ‘‘हिंदु मुलींच्या धर्मांतराचे सूत्र महत्त्वाचे आहे. अनेक मुलींना या जाळ्यात ओढले जात आहे. अशा विवाह संस्थांवर कारवाई करून संबंधित आरोपींना अटक केली पाहिजे.’’

राणे यांनी विधानसभेतही वरील सूत्र उपस्थित केले होते. त्या वेळी नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील घटनेचा संदर्भ दिला होता. ‘‘हिंदूंच्या मुलीचे धर्मांतर करण्यासाठी जातीवरून किंमत ठरते. शीख मुलीसाठी ७ लाख, ब्राह्मण मुलीसाठी ५ लाख, क्षत्रिय मुलीसाठी ४ लाख, गुजराती ब्राह्मण मुलीसाठी ६ लाख, पंजाबी हिंदु मुलीसाठी ६ लाख असे ‘रेट कार्ड’ आहेे’’, असा आरोपही त्यांनी त्या वेळी केला होता.