अलीगड (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधाकडून शिवमंदिरातील मूर्तींची तोडफोड, तर एका मूर्तीची चोरी

धर्मांध तरुणाला अटक

प्रतीकात्मक छायाचित्र

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथे धर्मांध तरुणाने शिवमंदिरामधील देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. त्याने मूर्तींची तोडफोड करण्यासह एक मूर्ती पळवून नेली. या तोडफोडीच्या घटनेमुळे येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. आंदोलनामध्ये माजी महापौर शकुंतला भारती याही सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनामुळे येथे मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेत या तरुणासमेवत त्याचे अन्य साथीदारही असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

अशा घटनांविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच मुसलमानांचे नेते कधीही तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !