धर्मांधाने खोटे बोलून हिंदु तरुणीशी केला विवाह !

धर्मांतरासाठी आणला दबाव

नीमच (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशच्या नीमच जिल्ह्यामध्ये अशरफ खान नावाच्या तरुणाने खोटे बोलून एका हिंदु मुलीशी लग्न केले आणि नंतर तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला. पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार ‘अशरफ खान याने स्वत: घटस्फोटित असल्याचे सांगून माझ्याशी लग्न केले. २ मासांनी तो विवाहित असल्याचे मला कळले.  यानंतर त्याने माझ्यावर धर्म पालटण्यासाठी दबाव आणण्यास आणि मारहाण करण्यासही चालू केले. त्याने मला ३ वेळा गर्भपात करण्यास भाग पाडले.’
अशरफच्या अत्याचाराला कंटाळून पीडित तरुणीने विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष सत्यनारायण पाटीदार आणि मातृशक्ती जिल्हा समन्वयक रेखा वर्मा यांच्या साहाय्याने महिला पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. अशरफच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘लवकरच त्याला अटक करून पीडित मुलीला न्याय मिळवून दिला जाईल’, असे महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी अनुराधा गिरवाल यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांधांना कायद्याचे जराही भय नसल्याचे दिसून येत आहे. धर्मांधांवर वचक बसेल, अशी कारवाई प्रशासनाने करणे आवश्यक !