२५.८.२०२२ (श्रावण कृष्ण त्रयोदशी) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. कुशल गुरव यांचा २८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करणार्या साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. कुशल गुरव यांना २८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. शिकण्याची वृत्ती
‘कुशलदादांकडे आश्रम स्तरावरील अनेक सेवा आहेत, तसेच त्यांना सेवांचा पुष्कळ अनुभव आहे, तरीसुद्धा ते सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. दादा त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या साधकांकडूनही सतत शिकत असतात.
२. बर्याच वेळा आम्ही त्यांना सेवेमध्ये काही पालट सुचवतो. तेव्हा ते आम्ही सुचवलेले पालट स्वीकारतात.
३. स्वतःकडून झालेल्या चुका सहजतेने सांगणे
कुशलदादा वयाने आमच्यापेक्षा ७ – ८ वर्षांनी मोठे आहेत, तरीही ते आम्हाला त्यांच्याकडून झालेल्या चुका अगदी मोकळेपणाने आणि सहजतेने सांगतात.
४. सेवा परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे
अ. सेवेमधील अडचणींवर मात करण्यासाठी दादा गुरुदेवांना प्रार्थना करून कृतीच्या स्तरावर विविध उपाययोजना काढतात आणि सेवा अधिकाधिक चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतात.
आ. दादा समयमर्यादेत सेवा पूर्ण करण्यासाठी झटत असतात.
५. सहसाधकांना साधनेत साहाय्य करणे
५ अ. ‘सर्व साधकांनी गुरूंना अपेक्षित अशी साधना करून साधनेत प्रगती करावी’, अशी दादांची तळमळ असते.
५ आ. साधकांना तत्त्वनिष्ठपणे आणि प्रेमाने चुका सांगणे : दादा सहसाधकांकडून साधना करतांना झालेल्या चुका भावनाशील न होता त्यांना तत्त्वनिष्ठपणे आणि प्रेमाने सांगतात. साधकांना चुका सांगण्यामागे दादांचा पुढील विचार असतो, ‘तत्त्वनिष्ठता’ हा साधनेतील महत्त्वाचा गुण आहे. साधकांना तत्त्वनिष्ठपणे चुका सांगितल्यामुळे त्यांना त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव होऊन साधनेत साहाय्य होते अन् त्यातून आपलीही साधना होते.’ त्यामुळे संबंधित साधकांना चुकीचा ताण येत नाही आणि त्यांच्याकडून स्वभावदोषांवर मात करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न होतात.
५ इ. साधकांची भावजागृती होण्यासाठी सत्संगात प्रतिदिन एकेका साधकाला प्रार्थना आणि भावप्रयोग घेण्यास सांगणे : प्रतिदिन होणार्या सेवेविषयीच्या सत्संगात दादा प्रत्येक वेळी एकेका साधकाला प्रार्थना आणि भावप्रयोग घेण्यास सांगतात. त्यामुळे साधकांच्या अंतरातील भाव जागृत होऊन त्यांना साधनेचे प्रयत्न करण्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळते.
६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि संत यांच्याप्रतीचा भाव
६ अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा संपादन करण्यासाठी सेवा मिळाली आहे’, असा भाव असणे : सेवा करतांना दादांचा भाव असतो, ‘एवढ्या मोठ्या आश्रमातील सेवा मला मिळाल्या आहेत. या सेवांच्या माध्यमातून मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा संपादन करून त्यांचे मन जिंकायचे आहे.’
६ आ. संतांनी सांगितलेली सूत्रे तळमळीने सहसाधकांना सांगणे : काही सेवांच्या निमित्ताने दादा एका संतांकडे जातात. तेव्हा दादा त्या संतांनी सांगितलेली सर्व सूत्रे पुष्कळ तळमळीने सहसाधकांना सांगतात. तेव्हा ते म्हणतात, ‘‘संतांनी सांगितल्याप्रमाणे आपण प्रयत्न करूया आणि संतांचे मन जिंकूया.’’
७. जाणवलेला पालट – प्रेमभाव वाढल्याचे जाणवणे
कुशलदादांमधील प्रेमभाव पूर्वीच्या तुलनेत पुष्कळ वाढला आहे. ते साधकांच्या प्रकृतीशी जुळवून घेऊन बोलतात. दादा त्यांच्या बोलण्याने साधकांना सहजतेने आपलेसे करतात आणि त्यांना प्रेम देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नवीन आलेल्या साधकांना ‘आपण दादांशी प्रथमच बोलत आहोत’, असे वाटत नाही. दादांमधील प्रेमभाव, मनमोकळेपणा आणि सहजता या गुणांमुळे त्यांनी आश्रमातील सर्व साधकांना आपलेसे करून घेतले आहे. आश्रमातील बर्याच साधकांना दादांचा आधार वाटतो.’
– गुरुसेवक,
श्री. किरण माळी (वय २० वर्षे) आणि श्री. राजेश दोंतुल (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.८.२०२२)