सोलापूर येथील पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी घोषित !

सोलापूर – येथील मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वर्ष २०२२-२३ च्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री. संजय साळुंखे, तर सचिवपदी श्री. अमर बोडा यांची एकमताने निवड करण्यात आली. या वेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. जनार्दन कारमपुरी, विश्वस्त सचिव श्री. अजय दासरी, विश्वस्त सर्वश्री पांडुरंग दीड्डी, विष्णु कारमपुरी, सुरेश फलमारी, रामचंद्र जन्नू, विनोद देविदास, विजयकुमार गुल्लापल्ली इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. वर्ष २०२२-२३ च्या उत्सव समितीमध्ये कार्याध्यक्ष श्री. तुषार जक्का, उपाध्यक्ष, सह सचिव, खजिनदार, मिरवणूक प्रमुख, कार्यालय प्रमुख आणि प्रसिद्धीप्रमुख यांची निवड करण्यात आली आहे.