पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले ‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. श्रेय प्रशांत बाकडे हा या पिढीतील एक आहे !
श्रावण कृष्ण द्वादशी (२३.८.२०२२) या दिवशी कु. श्रेय प्रशांत बाकडे याचा १० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्री. प्रशांत बाकडे (कु. श्रेयचे वडील) आणि अन्य नातेवाईक यांनी कु. श्रेयमध्ये जाणवलेले पालट येथे दिले आहेत.
कु. श्रेय प्रशांत बाकडे याला १० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. श्री. प्रशांत वसंतराव बाकडे (कु. श्रेयचे वडील), वर्धा
१ अ. भ्रमणभाष हातात न घेण्याचे प्रायश्चित्त चालू असल्याने भ्रमणभाषवर खेळू शकत नसल्याचे प्रांजळपणे सांगणारा कु. श्रेय बाकडे ! : ‘एकदा श्रेयच्या आतेभावाचा (कु. सुचित विनय पराते, वय २४ वर्षे) भ्रमणभाष आला होता. तो श्रेयला म्हणाला, ‘‘आपण भ्रमणभाषवर खेळ (गेम) खेळूया.’’ तेव्हा श्रेय म्हणाला, ‘‘मी खेळू शकत नाही; कारण माझे भ्रमणभाष हातात न घेण्याचे प्रायश्चित्त चालू आहे. ‘ते ऐकून त्याच्याकडून पुष्कळ शिकण्यासारखे आहे’, असे मला वाटले.
१ आ. आढाव्यामध्ये भाववृद्धीसाठी प्रयोग घ्यायला सांगितल्यावर तो लगेच ‘हो’, म्हणतो.’
२. श्रीमती विमल वसंतराव बाकडे (श्रेयच्या आजी, वडिलांची आई), वर्धा
२ अ. व्यष्टी साधनेचा आढावा चालू झाल्यापासून श्रेयच्या बोलण्यामध्ये अधिक मधुरता आणि आज्ञाधारकपणा आल्याचे जाणवणे : ‘कु. श्रेयचा व्यष्टी साधनेचा आढावा चालू झाल्यापासून तो अधिक वेळ नामजप करायला लागला. आढावा सत्संगासाठी वेळेपूर्वीच स्वतःचे आवरून तो सिद्ध असतो. आढावा चालू झाल्यापासून त्याच्या बोलण्यामध्ये अधिक मधुरता आणि आज्ञाधारकपणा जाणवतो.
२ आ. एक दिवस त्याच्या बाबांनी (श्री. प्रशांत वसंतराव बाकडे यांनी) अंघोळ करून झाल्यावर गोमूत्र लावले होते. सर्वांनाच गोमूत्राचा गंध येत होता; परंतु श्रेयला मोगरा अत्तराचा सुगंध आला.’
३. श्रीमती सुषमा पराते (कु. श्रेयची आत्या), नागपूर
अ. ‘श्रेयचा व्यष्टी साधनेचा आढावा चालू होण्यापूर्वी कु. श्रेय पुष्कळ मस्ती करायचा. ‘मस्ती करू नकोस’, असे सांगूनही तो ऐकायचा नाही. आता तो शांत झाला आहे.
आ. मी श्रेयला भ्रमणभाष केला नाही, तर तो आधी माझ्यावर रागवायचा. आता त्याचा राग न्यून झाला आहे.
इ. त्याच्यामध्ये ‘भावनाशीलता’ हा दोष प्रामुख्याने होता. तो आता समजूतदार झाला आहे. त्याला कोणतीही अडचण सांगितली, तर तो समजून घेतो.’
४. स्वभावदोष
राग येणे
जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आणि कृपाळू गुरुमाऊली, आपल्या कृपेने मला व्यष्टी आढावा सत्संगामुळे माझ्या मुलामध्ये झालेले पालट लिहून देण्याची संधी मिळाली. हा पालट आपल्या कृपेमुळेच होऊ शकला. त्याविषयी मी आपल्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’ – श्री. प्रशांत वसंतराव बाकडे (कु. श्रेयचे वडील), वर्धा (२०.९.२०२१)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |