‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा’ या ओळीप्रमाणे जीवन जगणार्‍या सौ. माधुरी गाडगीळ आणि कोणतीही सेवा भावपूर्ण अन् परिपूर्ण करणारे श्री. माधव परमानंद गाडगीळ !

‘रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात वास्तव्यास असणार्‍या सौ. माधुरी गाडगीळ (वय ७९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांची वेणी घालण्याची सेवा करण्यासाठी मी त्यांच्या खोलीत जाते. त्या वेळी मला (सौ. सुचेता नाईक हिला) सौ. माधुरी गाडगीळआजी आणि श्री. माधव गाडगीळआजोबा (वय ८५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे आई आणि वडील) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. सौ. माधुरी गाडगीळ

सौ. माधुरी गाडगीळ
सौ. सुचेता नाईक

१ अ. मितभाषी असणे : ‘सौ. गाडगीळआजी क्वचितच बोलतात. ‘त्या नेहमी देवाच्या अनुसंधानात असतात’, असे मला जाणवले.

१ आ. कौतुक करणे : काही सण किंवा आश्रमात काही कार्यक्रमाच्या निमित्ताने मी नवीन किंवा ठेवणीतील साडी नेसते. तेव्हा त्या कौतुकाने म्हणतात, ‘‘तुम्ही छान छान साड्या नेसता हं !’’

१ इ. आजींचे स्वतःच्या आजारपणाबद्दल कोणतेही गार्‍हाणे नसणे

अ. आजींचे त्यांच्या आजारपणाबद्दल कोणतेही गार्‍हाणे नसते. त्या चुकूनही ‘मला त्रास होत आहे’, असे म्हणत नाहीत.

आ. मी एकदा आजींना म्हणाले, ‘‘आजी, तुमचे गुडघे दुखतात का ? माझे गुडघे दुखतात.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘माझे गुडघे दुखत नाहीत आणि मला काहीही त्रास होत नाही.’’ प्रत्यक्षात त्या स्वतः काहीच हालचाल करू शकत नाहीत, तरीही त्या त्रासलेल्या नसतात. त्या सतत आनंदी असतात.

१ ई. चुका स्पष्टपणे सांगणे : ‘मी आजींची वेणी घातल्यानंतर कंगव्याचे दात खालच्या बाजूला येतील’, अशा पद्धतीने कंगवा ठेवत असे. २ दिवसांनी आजी मला म्हणाल्या, ‘‘कंगव्याचे दात वरच्या बाजूला येतील, असा कंगवा ठेवा. त्यामुळे कंगव्याचे दात खराब होत नाहीत.’’

२. श्री. माधव परमानंद गाडगीळ

श्री. माधव गाडगीळ

२ अ. ‘आजोबांचा स्वभाव बोलका आहे. ते सर्वांची प्रेमाने चौकशी करतात.

२ आ. नीटनेटकेपणा : आजोबा अग्निहोत्र करतात. त्याची सिद्धता ते मन लावून आणि व्यवस्थितपणे करतात. त्यांनी अग्निहोत्रासाठी लागणार्‍या गोवर्‍यांचे (शेणींचे) तुकडे अग्निहोत्राच्या पात्रामध्ये एकसारखे ठेवलेले असतात. त्यावर ते कापराचे तुकडेही व्यवस्थित ठेवतात. त्यामुळे अग्निहोत्राच्या पात्राकडे पाहून चांगले वाटते.

२ इ. वेळेचे काटेकोरपणे पालन करणे : प्रत्येक कृती ठरलेल्या वेळेतच करतात. त्यांची कोणतीही कृती ठरवलेल्या वेळेपेक्षा कधीच मागे-पुढे होत नाही.

२ ई. आजोबा कधीच कंटाळलेले नसतात. त्यांच्या तोंडी कधीही ‘कंटाळा आला’ हा शब्द नसतो.

२ उ. सेवेची तळमळ : आजोबा एवढ्या व्यस्ततेतही टंकलेखनाची सेवा करतात. पहिली सेवा संपली की, ते लगेच दुसरी सेवा मागून घेतात.

२ ऊ. कोणतीही सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करणे

१. ‘आजींना स्वतःहून हालचाल करता येत नाही. त्यामुळे त्यांना उठवून बसवणे आणि पुन्हा त्यांना झोपवणे’, या सेवाही आजोबा मनापासून आणि आनंदाने करतात.

२. आजींची सेवा करतांना आजोबा कधीच त्रासलेले नसतात. ‘आजींची सेवा करावी लागते’, असे त्यांचे कधीही गार्‍हाणे नसते.

‘हे गुरुमाऊली, ‘आजी-आजोबांचे गुण मलाही अंगी बाणवता येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना !’

‘पतीने पत्नीची सेवा केली’, असे मी कधी पाहिले नाही; परंतु उतारवयातही आजोबा आजींची सेवा करतात. हे पाहून केवळ आणि केवळ गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) असे साधक घडवतात, हे लक्षात येते. त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. गुरुदेवा आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. सुचेता नाईक, फोंडा, गोवा. (१६.६.२०२२)