व्हावे संतवैद्य चालूनी मोक्षवाट ।

डॉ. उज्ज्वल कापडिया यांचा श्रावण शुक्ल सप्तमीला (१८.८.२०२२ या दिवशी) वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुचलेली कविता येथे दिली आहे.

आधुनिक वैद्य उज्ज्वल कपाडिया

सप्तरंग उधळूनी
अष्टदिशा उजळती ।
उज्ज्वल आणि कृष्ण
यांच्या जन्मदिनी ।। १ ।।

श्रावणमासी कृष्ण आनंद देई समष्टीस ।
सुस्वभावे उज्ज्वल करी आपुला सर्वांस ।। २ ।।

श्री. धैवत वाघमारे

असे रामभक्ती मनी ।
परि सखा लाभला कृष्ण तो ।। ३ ।।

राम म्हणावा कृष्ण म्हणावा ।
असे विष्णुतत्त्व दोघांत ।। ४ ।।

विष्णुस्वरूप भेटली गुरुमाऊली (टीप १) ।
नेण्यास वैकुंठलोकी ।। ५ ।।

चालता तयासंगे होई कृपादृष्टी ।
व्हावे संतवैद्य चालूनी मोक्षवाट ।। ६ ।।

टीप १ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.८.२०२२)