|

नवी देहली – माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते शाहनवाज हुसेन यांच्या विरोधात बलात्कार आणि अन्य आरोप यांप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचा आदेश देहली उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला. यासह या प्रकरणांचे अन्वेषण पुढील ३ मासांत पूर्ण करण्यासही न्यायालयाने सांगितले. देहलीत रहाणार्या एका महिलेने जानेवारी २०१८ मध्ये सत्र न्यायालयात याचिका प्रविष्ट करून शाहनवाज हुसेन यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. महिलेच्या आरोपानुसार, शाहनवाज हुसेन यांनी छतरपूर येथील शेतघरात नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिला ठार मारण्याची धमकी दिली होती.
The #DelhiHighCourt has directed the police to file an FIR against #BJP leader #ShahnawazHussain in a rape case.@sanjoomewati https://t.co/q440dlDWNX
— IndiaToday (@IndiaToday) August 18, 2022
देहली न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणाची सर्व वस्तूस्थिती पहाता हे स्पष्ट होते की, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यास पोलीस फारसे उत्सुक नाहीत, तसेच पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात सादर केलेला अहवाल हा अंतिम अहवाल नाही. (हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)
संपादकीय भूमिकामंत्र्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी जनतेला न्यायालयाचे दार ठोठवावे लागू नये ! |
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !
हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप