श्रीकृष्णाशी संबंधित ऋषी, भक्त आणि संत

१. संबंधित ऋषी : शांडिल्यऋषि, गर्गाचार्य, सांदिपनीऋषि, महर्षि व्यास आदी ऋषी श्रीकृष्णाचे भक्त होते.

२. संबंधित भक्त : वसुदेव, देवकी, यशोदा, नंदराजा, बलराम, राधा, गोपी, सुदामा, अर्जुन, अक्रूर, उद्धव, भीष्माचार्य, विदुर, असे श्रीकृष्णाचे अनेक भक्त होते.

३. श्रीकृष्णाची उपासना करणारे विविध कृष्णभक्त

अ. वात्सल्यभाव असणारे देवकी आणि वसुदेव अन् नंदराजा आणि यशोदा

आ. सख्यभाव असणारे गोप

इ. मधुराभक्ती करणार्‍या गोपी आणि राधा

ई. कांताभक्ती करणार्‍या रुक्मिणी, सत्यभामा, कालिंदी आदी राण्या

उ. वंदनभक्ती करणारा अक्रूर

ऊ. सख्यभक्ती करणारा अर्जुन

ए. आत्मनिवेदनभक्ती करणारा बलीराजा

ऐ. विरोधीभक्ती करणारे कंस, चाणूर, बाणासूर, जरासंध, दुर्याेधन, शकुनी, शिशुपाल आदी दुर्जन.

४. संबंधित संत : कलियुगात संत मीरा, संत सूरदास, संत नरसी मेहता, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत कनकदास, चैतन्य महाप्रभु आदी संतांनी श्रीकृष्णाची निस्सीम भक्ती केली.

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(वर्ष २०१६)