कु. अपाला औंधकर हिने ‘कर्तेपणा आणि स्वकौतुक वाटू नये’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना केलेली प्रार्थना !

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कु. अपाला औंधकर

‘एकदा एका सत्संगात परात्पर गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) सर्व दैवी बालकांचे कौतुक केले. त्या वेळी माझ्या मनाची झालेली पुढील विचारप्रक्रिया मी परात्पर गुरुदेवांना आत्मनिवेदन स्वरूपात मांडली. ‘हे गुरुदेवा, तुम्हीच साक्षात् श्रीमन्नारायणस्वरूप भगवंत आहात. तुम्हीच आम्हाला घडवत असता. आम्ही करत असलेल्या प्रयत्नांत आमचे असे काहीच नाही. तुम्हीच आम्हाला आपलेसे केले असून आमच्यावर अखंड प्रीतीचा वर्षाव करत असता. आम्हाला कधीच आमचे कौतुक वाटू देऊ नका. आम्हाला आमचा कर्तेपणा सतत तुमच्या चरणी अर्पण करता येऊ दे.’ त्यांना हे आत्मनिवेदन केल्यावर मला आपोआप पुढील ओळी सुचल्या.

देवा, कर्तेपणा, स्वकौतुक, स्वकेंद्रितता नको ।
माझ्या प्रयत्नांचे श्रेय तुज चरणांशी अर्पिल्यावर ।
त्याचे कृतज्ञतापुष्प व्हावे ।
अन् अहंविरहित निर्मळ पुष्प मी व्हावे ।।’

– सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची,

कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा (२१.७.२०२२)