भारतियांनो, राष्ट्रध्वजाची विटंबना टाळा !

सर्व विज्ञापनदाते, वाचक, हितचिंतक आणि धर्माभिमानी यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

राष्ट्राभिमान जागृत होण्यासाठी वर्षातील ३६५ दिवस कृती करा !

वरील चित्रे विडंबनात्मक हेतूने नव्हे, तर केवळ माहितीसाठी दिली आहेत.

भारतियांनो, राष्ट्र आणि राष्ट्रध्वज यांच्याप्रती आदर बाळगा !

१. राष्ट्र म्हटले की, त्याचा एक ध्वज असतो, जो राष्ट्राचे प्रतीक आहे. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !

२. राष्ट्रध्वजाविषयी आदर वाटत असेल, तर ‘तो कधीही रस्त्यावर पडणार नाही किंवा फाटणार नाही’, याची काळजी घ्या !

३. केवळ दोनच दिवस राष्ट्रध्वजाचा मान न राखता वर्षभर त्याच्याप्रती अभिमान जागृत ठेवा !