पुणे – महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी केमिकल काँक्रेटचा उपयोग चालू केला असून त्यामुळे अल्प वेळात आणि अल्प खर्चात खड्डे बुजवणे शक्य झाले आहे. अल्प वेळात खड्डा बुजवला जात असल्याने वाहतुकीला होणारा अडथळा ही अल्प होणार आहे, असा दावा महापालिकेने केला. महापालिका संबंधित कंत्राटदाराला खड्ड्यांची यादी पाठवते त्यानंतर खासगी कंत्राटदार केमिकल काँक्रीटचा उपयोग करून खड्डे बुजवतो, अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली. सध्या औंध, बाणेर, कोथरूड, शिवाजीनगर इत्यादी परिसरात या पद्धतीने खड्डे बुजवले आहेत.