हुपरी (जिल्हा कोल्हापूर) –‘हलाल’च्या वाढत्या मागणीमुळे मांसविक्रीचा वार्षिक अनुमाने ३ लाख कोटी रुपयांचा संपूर्ण व्यवसाय धर्मांधांच्या नियंत्रणात जात आहे. हलाल व्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेला समाप्त करण्यासाठी रचलेले एक षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. अमोल कुलकर्णी यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने ७ ऑगस्ट या दिवशी ससेनगर येथे व्यापारी-उद्योजक यांसाठी ‘हलाल जिहाद’ या विषयावर बैठक झाली. त्या प्रसंगी ते बोलत होते. हुपरी येथील धर्मप्रेमी श्री. नितीन काकडे यांच्या पुढाकाराने ही बैठक पार पडली.
‘अशा बैठका वारंवार व्हायला हव्यात’, असे मत काही उद्योजकांनी व्यक्त केले. काही व्यापार्यांनी ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाची मागणी केली, तर एका उद्योजकांनी त्यांच्या भागात सत्संग चालू करण्याची मागणी केली. या बैठकीला उद्योजक सर्वश्री बसवंत गळतगे, बाबासाहेब जगदाळे, राहुल पोतदर, नितीन खोत, अशोक मालवेकर, प्रवीण काजवे, राजू ऐनापुरे, दत्ताजी पाटील, अनिल शिंदे, राजेंद्र पवार, सागर गाट, जनार्दन काटकर यांसह अनेक उद्योजक उपस्थित होते.