कोयना धरणाचे ६ वक्री दरवाजे उघडले : १० सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू !

कोयना धरण

सातारा, १२ ऑगस्ट (वार्ता.) –  कोयना धरण ८७ टी.एम्.सी. (साठा क्षमता १०५ टी.एम्.सी.) भरले असल्याने १२ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० वाजता कोयना धरणाचे ६ वक्री दरवाजे दीड फूट उघडण्यात आले असून त्यातून १० सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू झाला आहे. यामुळे आता कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. तरी नदीकाठच्या गावांना सतर्कची चेतावणी देण्यात आली आहे.