रामनाथी (गोवा) – कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीला धीराने तोंड देत शेवटच्या श्वासापर्यंत साधनारत असलेल्या सनातनच्या साधिका कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर (देहत्याग : १८.१०.२०२१) या सनातनच्या १२१ व्या संतपदी आणि कै. (सौ.) शालिनी प्रकाश मराठे (देहत्याग : १६.७.२०२२) या सनातनच्या १२२ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी एका संदेशाद्वारे दिली. पू. (कै.) सौ. प्रमिला रामदास केसरकर (मृत्यूसमयी वय ६६ वर्षे) आणि पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे (मृत्यूसमयी वय ७४ वर्षे) यांनी सनातनच्या मार्गदर्शनाखाली दीर्घकाळ साधना केली. मृत्यूपूर्वी कठीण शारीरिक स्थितीतही भगवंतभक्तीच्या आधारे स्थिर रहाणे, भगवंताचे अस्तित्व अनुभवून भेटायला येणार्या साधकांनाही आनंद देणे, ही त्यांची वैशिष्ट्ये होती.