१५ ऑगस्ट हा ‘स्वातंत्र्यदिन’ म्हणून भारतियांना भ्रमात ठेवणारे शासनकर्ते !

१५ ऑगस्ट २०२२ या दिवशी भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव आहे. त्या निमित्ताने…

भारतियांना जे स्वातंत्र्य दिले गेले, त्या संदर्भातील कायदा इंग्रजांच्या संसदेत सिद्ध करण्यात आला होता. इंग्रजांनी या कायद्याचे नाव ‘Indian Independence Act’ म्हणजेच ‘भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा’, असे दिले होते. अशा स्वरूपात फसवणुकीने मिळालेले स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य कुठे आहे ? त्यामुळे १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री मोहनदास गांधी देहलीमध्ये न येता नौखालीमध्ये राहिले होते.

सत्तेच्या अधीन होऊन भारताला पारतंत्र्यात ठेवणारे काँग्रेस नेते !

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गांधींना बोलवायला नौखालीला गेले; परंतु गांधींनी देहली येथे येण्यास नकार दिला होता. गांधी म्हणत होते, ‘‘स्वातंत्र्य मिळालेले नाही, केवळ सत्तेच्या हस्तांतरणाचा सामंजस्य करार होत आहे.’’ त्याविषयीची बातमी गांधींनी नौखालीतूनच वार्तापत्रामध्ये प्रसिद्ध केली होती. वार्तापत्रातील पहिल्याच वाक्यात गांधींनी म्हटले होते, ‘मी हिंदुस्थानच्या कोट्यवधी जनतेला संदेश देऊ इच्छितो की, हे जे तथाकथित स्वातंत्र्य (So Called Freedom) मिळाले आहे, हे मी आणलेले नाही. हे सत्तेची हाव असलेले लोक सत्तेच्या हस्तांतरणाच्या चक्रव्युहात फसून आणत आहेत. मी असे मानतच नाही की, या देशाला काही स्वातंत्र्य मिळाले आहे.’

(साभार : ‘दस्तावेज’ ई-पत्रिका)