‘जिहादी आतंकवाद्यांच्या संदर्भात तक्रार करण्यासाठी, तसेच कुणी शिरच्छेद करण्याच्या घोषणा देत असल्यास त्याच्याविषयीच्या तक्रारी करण्यासाठी संपर्क साधावा. सामाजिक माध्यमांतून कुणी आक्षेपार्ह पोस्ट करत असेल, तर त्यांचीही माहिती यावर द्यावी. माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल’, अशा प्रकारचे आवाहन करणारा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा (एन्.आय.ए.चा) संदेश सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यावर एन्.आय.ए.ने खुलासा करत, ‘अशा प्रकारचा कोणताही संदेश आमच्या यंत्रणेकडून प्रसारित करण्यात आलेला नाही. कुणीतरी खोडसाळपणा केला आहे’, असे सांगण्यात आले आहे.’