महराजगंज (उत्तरप्रदेश) येथे ५५ वर्षांच्या मौलवीकडून ८ वर्षांच्या मुलीवर मदरशात बलात्कार

(मौलवी म्हणजे ‘इस्लामचा धार्मिक नेता’)

महराजगंज (उत्तरप्रदेश) – येथील सानौली क्षेत्रातील एक बंद पडलेल्या मदरशामध्ये ५५ वर्षांचा मौलवी शमसुल हक याने ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आणि पळून गेला. पोलिसांनी त्याच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ही मुलगी दुकानात साहित्य आणण्यासासाठी जात असतांना शमसुल याने तिला आमीष दाखवून मदरशात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

संपादकीय भूमिका 

अशा वासनांधांना इस्लामी देशांत शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार मारण्याची शिक्षा देतात, त्याप्रमाणे शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !