पाकिस्तानला लाहोर कसे मिळाले ? याची कारणे

१५ ऑगस्ट २०२२ या दिवशी भारताचा ७५ वा ‘स्वातंत्र्यदिन’ आहे. यानिमित्ताने…

१. २३ मार्च १९४० या दिवशी लाहोरमध्ये झालेल्या ‘मुस्लिम लिग’च्या अधिवेशनात ‘पाकिस्तान’ निर्माण करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला.

२. वर्ष १९४१ च्या जनगणनेनुसार लाहोरमध्ये ४७ टक्के मुसलमान होते.

३. ‘मुस्लिम लिग’च्या नेत्यांनी मोठ्या चातुर्याने आणि दूरदर्शीपणे लाहोरच्या सीमेजवळ असणार्‍या मुसलमानबहुल गावांचा समावेश लाहोरच्या क्षेत्रात केला.

४. या गावांचा समावेश लाहोरमध्ये केल्यामुळे तेथील मुसलमानांच्या लोकसंख्येचे प्रमाण ५३ टक्के झाले.

५. काँग्रेसच्या वतीने भारताची बाजू मांडण्याचा अधिकार नेहरूंना दिला होता.

६. नेहरूंना खंडित भारतात तिरंगा फडकावण्याची पुष्कळ घाई होती. त्यामुळे त्यांनी सीमा निश्चित करणार्‍या आयोगाशी योग्य रितीने संवादच साधला नाही. भारताच्या वतीने सांगण्यात आले की, ‘लाहोरमधील ८५ टक्के जमिनीचे मालक हिंदू आहेत. त्यामुळे लाहोर शहर भारतातच राहिले पाहिजे. सीमा निश्चित करणार्‍या आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितले, ‘‘ज्या नगरांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येचे प्रमाण ५१ टक्के किंवा त्याहून अधिक असेल, ती नगरे पाकिस्तानला द्यावी लागतील.’’

७. केवळ ७ टक्के मुसलमानांनी काँग्रेसला मत दिले. अनुमाने ६३ लाख मुसलमानांची मते काँग्रेसला मिळाली की, ते विभाजनाच्या विरुद्ध होते. त्यांच्या हिश्श्याची भूमी २३ सहस्र चौरस कि.मी. होती. ते भारतात राहू इच्छित होते.

८. गांधी-नेहरू यांनी स्वतःच्या मनाशी ठरवले होते की, मुसलमानांनाही खंडित भारतात ठेवण्यात येईल.

९. जर काँग्रेसच्या वतीने सीमा आयोगाला ‘पाकिस्तानला ७ टक्के मुसलमानांना त्यांच्या हिश्श्याची २३ सहस्र चौरस कि.मी. भूमी मिळणार नाही आणि त्यांना फाळणीनंतरही खंडित भारतातच रहावे लागेल’, असे सांगण्यात आले असते, तर लाहोर निश्चितपणे भारतालाच मिळाले असते.

१०. यासंबंधी जर मौलाना आझाद यांच्या नेतृत्वाखाली एक निवेदन देण्यात आले असते, तर भारताची बाजू भक्कम झाली असती.

११. आमच्या मतानुसार जर आयोगाने पाकिस्तानला २३ सहस्र चौरस कि.मी. भूमी कमी देण्याचा निर्णय स्वीकारला असता, तर पश्चिम पंजाबचे लाहोर, स्यालकोट, ननकाना साहेब आणि सिंध प्रांताचे थारपारकर अन् उमरकोट हे जिल्हेसुद्धा भारतातच राहिले असते.

१२. नेहरूंच्या घाईमुळे आणि अदूरदर्शीपणामुळे पंजाबचे प्रसिद्ध नगर लाहोर भारतात न रहाता पाकिस्तानात गेले. या नगराला प्रभु श्रीरामाचे सुपुत्र ‘लव’ याने वसवले होते. हे नगर आर्य समाजाचे केंद्र होते. आर्य समाजाचे दुसरे प्रमुख महर्षि दयानंद यांनी स्वत:च्या परिश्रमाने हे केंद्र बनवले होते.

१३. काँग्रेसचे ऊठसूठ समर्थन करणारे आर्य समाजाचे अनुयायी पहातच राहिले आणि लाहोर पाकिस्तानला मिळाले.

– इंद्रदेव (म्यानमारवाले) आणि राजेश गोयल (साभार : साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, २० ते २६ ऑगस्ट २०१४)