रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. ‘आश्रमात मला पुष्कळ चांगले वाटले. येथील व्यवस्थापन आणि कार्य अतिशय शिस्तबद्ध आहे.’

– श्री. तुलसीदास मंगेशकर, कांदोळी, गोवा.

२. सकारात्मक आभा आणि स्थूल डोळ्यांना न दिसणारे दैवी ऊर्जेचे अस्तित्व असलेला रामनाथी आश्रम !

अ. ‘आश्रम अतिशय स्वच्छ आणि अप्रतिम आहे. येथील कार्यपद्धती चांगल्या आहेत. येथील साधक शिस्तप्रिय आणि सात्त्विक आहेत.

आ. येथे सर्वत्र सकारात्मक आभा दिसून येते. ‘येथे स्थूल डोळ्यांना न दिसणारे दैवी ऊर्जेचे अस्तित्व आहे’, हे मला समजले.

इ. हा आश्रम पहाण्यासाठी अधिकाधिक लोकांनी यावे, जेणेकरून त्यांना एवढ्या सुंदर ठिकाणाची माहिती मिळेल.’

– पूजा मंगेशकर, गोवा.