तुमसर (जिल्हा भंडारा) येथे ढगफुटीसदृश पाऊस !

नागपूर येथे शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ‘व्हॅन’ उलटली !

नागपूर येथे शाळेची गाडी उलटली, तुमसर (जिल्हा भंडारा) येथे ढगफुटीसदृश पाऊस

नागपूर – भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील धनेगाव अरण्य परिसरात ७ ऑगस्टच्या रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. पाण्याने भरलेला तलाव फुटून त्याचे पाणी २ गावांमध्ये शिरले. यामुळे ५ घरे पडली. अनेक घरांमधील अन्नधान्यासह साहित्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. बराचवेळ विद्युत्पुरवठाही बंद होता. गावातील रस्त्यांवर जणू नदीच वहात असल्याचे दिसत होते. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांचे निवास, भोजन, पिण्याचे पाणी आणि औषध यांची व्यवस्था प्रशासन करत आहे.

नागपूर येथे शाळेची गाडी उलटली !

नागूपर येथे ८ ऑगस्ट या दिवशी बेसा रस्त्यावर भर पावसात एका शाळेची गाडी उलटली. त्यात १६ विद्यार्थी होते. यात ३ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. नागरिकांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. गाडीत क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी भरण्यात आले होते. इंधनाचे भाव वाढल्याने पालकांना वाढीव शुल्क परवडत नाही. परिणामी मुलांना वाहनात अक्षरश: कोंबले जाते. या घटनेला उत्तरदायी असणार्‍या वाहनचालकाला अटक केली आहे. नागनदीत एक मुलगा वाहून गेल्याचे समजते.