मुंबई – ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटातील अभिनेते आमीर खान आणि अभिनेत्री करीना कपूर-खान यांच्यासह चित्रपटाचे लेखक अतुल कुलकर्णी यांची जुनी हिंदुविरोधी वक्तव्ये राष्ट्रप्रेमी हिंदूंनी पुन्हा ट्वीट (रिट्वीट) करत वरील चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले.
Price Of Celebrityhood? Boycott Laal Singh Chaddha Case In Point#AamirKhan #BoycottLaalSinghChaddha #Vibesofindiahttps://t.co/zY1FuNOsgr
— Vibes of India (@vibesofindia_) August 8, 2022
१. अतुल कुलकर्णी यांनी वर्ष २०१३ मध्ये ते स्वत: ‘नास्तिक’ असल्याचे ‘ट्वीट’ करून सांगितले होते, तसेच ‘तुम्हाला असे वाटते का की, मी हिंदु आहे ?’ असा प्रश्नही विचारला होता. यावर एकाने ‘अतुल कुलकर्णी हिंदु नाहीत, मग हिंदूंंनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे का ?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.
२. ११ ऑगस्ट या दिवशी ‘लालसिंह चढ्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेते आमीर खान यांनी ‘पत्नीला भारतात रहाणे असुरक्षित वाटते’, तर अभिनेत्री करीना कपूर-खान यांनीही विरोधी विधान केले होते. त्यामुळे राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले. यासह अतुल कुलकर्णी यांचीही हिंदुविरोधी वक्तव्ये पुढे आल्यामुळे राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी आणखी जोमाने लावून धरली आहे. (राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी जागरूक असणार्या हिंदूंचे अभिनंदन ! – संपादक)
संपादकीय भूमिकाप्रत्येक हिंदूने राष्ट्रप्रेमी हिंदूंच्या आवाहनाला प्रतिसाद देत हिंदुविरोधकांना त्यांची जागा दाखवून द्यावी ! |