खेडा (गुजरात) येथे मुसलमानांचा लँड जिहाद !
खेडा (गुजरात) – खेडा जिल्ह्यातील नडियाद येथे लँड जिहादचे प्रकरण समोर आले आहे. येथील मतार तालुक्यात मुसलमान समाजातील लोकांनी बनावट कागदपत्रांद्वारे ४०० कोटी रुपये मूल्याची भूमी विकत घेतल्याचे समोर आले आहे. वर्ष २०१२ पासून आतापर्यंत भूमीच्या खरेदी-विक्रीची ६२८ संशयास्पद प्रकरणे समोर आली आहेत. प्रशासनाने ५०० हून अधिक लोकांना नोटीस पाठवून या संदर्भात पुरावे सादर करण्याचा आदेश दिला आहे, तसेच प्रशासनाने २५० प्रकरणांत कायद्याच्या आधारे भूमी जप्तही केली आहे.
एक ही समुदाय ने हथिया ली ₹400 करोड़ की 2000 बीघा जमीन, मंदिर का बदल दिया नाम: गुजरात के खेड़ा में ‘लैंड जिहाद’ पर सरकार सख्त#Gujarat #LandJihadhttps://t.co/xq3mbDWgIr
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 8, 2022
संपूर्ण प्रकरण ‘लँड जिहाद’ ! – गुजरातचे महसूलमंत्री राजेंद्र त्रिवेदी
या प्रकरणी राज्याचे महसूलमंत्री राजेंद्र त्रिवेदी यांनी स्वतः मतार तालुका कार्यालयात जाऊन १ सहस्र ९३० प्रकरणांची चौकशी करण्याचा आदेश दिला, तसेच ‘या प्रकरणांत निष्काळजीपणा करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात येईल’, असे त्यांनी सांगितले. ‘एकाच धर्मातील लोक सामूहिकरित्या येथील भूमी कशी काय खरेदी करत आहेत ?’, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘याची चौकशी करून ‘त्यांचा उद्देशा काय होता ?’, हे पडताळले जाईल. ‘त्यासाठी त्यांना पैसे कुठून आले ?, कुणी दिले ?’ याचीही चौकशी केली जाईल. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडूनही चौकशी केली जाऊ शकते. हे संपूर्ण प्रकरण ‘लँड जिहाद’ असल्याचे लक्षात येते. ‘येथील प्राणनाथ महादेव मंदिराची भूमी विकण्यासाठी मंदिराचे नावच पालटून टाकण्यात आले’, असेही ते म्हणाले.
संपादकीय भूमिकाएवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळा होईपर्यंत प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलीस झोपले होते का ? |