पीडित हिंदु महिलेने हत्या केल्याचा आरोप
(‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणजे विवाह न करता एकत्र रहाणे)

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – विवाहित हिंदु महिलेसमवेत जवळपास ३ वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहून लग्न करण्यास नकार दिल्याच्या प्रकरणी फिरोज सलमानी याची संतापलेल्या महिलेने वस्तराने गळा चिरून हत्या केल्याचा आरोप तिच्यावर आहे. ७ ऑगस्ट २०२२ ला रात्री पोलिसांनी पीडितेला कह्यात घेतले. या प्रकरणी अन्वेषण चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
येथील ३२ वर्षीय हिंदु महिलेचा विवाह दीपक यादव याच्याशी झाला होता. वाद झाल्यामुळे प्रीती ३ वर्षांपूर्वी पतीपासून विभक्त झाली होती. तेव्हापासून ती फिरोज सलमानीसमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये रहात होती. कालांतराने प्रीतीने फिरोजला लग्नासाठी विचारणा केली असता फिरोजने नकार दिला. यावरून दोघांमध्ये भांडण होत असे आणि त्यातूनच फिरोजची हत्या झाली असावी, असे गाझियाबादचे पोलीस अधीक्षक मुनिराज यांनी सांगितले.
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक