साधकांना आधार देणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे नाशिक येथील श्री. नीलेश नागरे !

श्री. नीलेश नागरे

१. साधकांना सेवेत साहाय्य करणे

कु. प्रियांका शिंदे

‘माझी श्री. नीलेशदादांशी काही दिवसांपूर्वीच ओळख झाली असूनही ‘आमची फार पूर्वीपासून ओळख आहे’, असे मला जाणवले. मला सेवेत काही अडचणी आल्यास दादा मला तत्परतेने साहाय्य करतात. आमच्या ‘ऑनलाईन’ व्याख्यानाच्या वेळी दादांची तांत्रिक गोष्टी सांभाळण्याची सिद्धता असते.

२. जवळीक वाटणे

दादांचा ‘प्रत्येक साधक गुरूंचा सेवक आहे आणि त्यांना साहाय्य करणे’, ही माझी सेवा आहे’, असा भाव असतो. ते साधकांना त्यांच्या सेवेत साहाय्य करतात. दादा आम्हा सर्वांना जवळचे अन् हवेहवेसे वाटतात.

३. साधकांना आधार देणे

माझ्याकडून सेवेत काही चुका झाल्या होत्या. त्या वेळी मी दादांशी मनमोकळेपणाने बोलू शकले. त्यांनी मला सांगितले, ‘‘देव आपल्याला प्रसंगातून शिकवत असतो. आपण ते सर्व स्वीकारायचे आणि गुरूंप्रती शरणागतभाव अन् श्रद्धा वाढवून प्रयत्न करायचे. यातून तू पुढच्या टप्प्याला जाणार आहेस.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला हलकेपणा जाणवला.

४. शिकण्याची वृत्ती

ते मला म्हणाले, ‘‘तुझ्या ज्या चुका झाल्या, त्याविषयी मला सांगितलेस, तर त्यातून मला शिकता येईल.’’ तेव्हा ‘दादा शिकण्याच्या स्थितीत असतात’, असे मला वाटले.

५. गुरूंप्रती श्रद्धा

दादांना भ्रमणभाष केल्यावर ते म्हणतात, ‘‘गुरुमाऊलींना जसे अपेक्षित आहेत, तसे आपण प्रयत्न करूया. आपण गुरूंचे सेवक आहोत आणि गुरुदेव जे सांगतील, त्याप्रमाणे आपण करायचे. परात्पर गुरुमाऊली एवढी कृपाळू आहे की, ‘ती आपला उद्धार करणारच आहे.’’

६. ‘दादांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली’, हे समजल्यावर मला पुष्कळ आनंद होऊन माझी भावजागृती झाली. मी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांना भ्रमणभाष केल्यावर ते कृतज्ञताभावात असल्याचे मला जाणवले.’

– कु. प्रियांका शिंदे, निफाड, नाशिक. (८.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक