१. ‘आश्रमात आल्यानंतर मला अनुभवायला मिळाले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेमुळे जे दैवी कार्य चालले आहे, ते काही सर्वसाधारण कार्य नाही.’ येथे आल्यानंतर माझ्या रोमारोमांत दैवी शांती देणारे दिव्य चैतन्य ओतप्रोत भरले गेले.’ – श्री. राम ज्ञानीदास महात्यागी (संस्थापक, महात्यागी सेवा संस्थान, श्री तिरखेडी आश्रम), गोंदिया, महाराष्ट्र. (१५.६.२०२२)
२. ‘हा आश्रम म्हणजे भारतीय सनातन संस्कृतीचे साक्षात् प्रतिबिंब आहे.’ – श्री. परमात्माजी महाराज (श्री परमात्मा महासंस्थानम्), धारवाड, कर्नाटक. (१५.६.२०२२)
३. ‘हा आश्रम म्हणजे धरतीवरील स्वर्ग आहे. येथे आल्यावर सकारात्मक ऊर्जा मिळते.’ – प.पू. चंद्रकांत महाराज शुक्ल (जिल्हा प्रमुख, गुरुवंदना मंच), बलसाड, गुजरात. (१६.६.२०२२)
४. ‘तुम्ही करत असलेले संशोधनकार्य अत्यंत प्रशंसनीय आहे.’- श्री. देवेंद्र कुमार, फोंडा, गोवा. (१७.६.२०२२)