१६ सहस्र झाडांची अवैध तोड होऊ देणारे प्रशासन देशाचा सर्वनाश होऊ देईल !

‘सावंतवाडी आणि दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) या तालुक्यांतील वृक्षतोड बंदी असलेल्या क्षेत्रांतील सुमारे १६ सहस्र झाडे तोडल्याचा प्रकार माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीमुळे उघड झाला आहे. या घटनेत प्रशासनाकडून संबंधितांवर कडक कारवाई न करता किरकोळ दंड आकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे अवैधपणे तोडण्यात आलेली झाडे सरकारकडे जमा करणे बंधनकारक असतांना ‘ही झाडे जागेवरच जाळून टाकण्यात आली’, असा खोटा पंचनामा करून बोगस (खोट्या) अनुज्ञप्तीच्या आधारे लाकडांची वाहतूक करण्यात आली आहे.’