मुंबई – ‘हर घर तिरंगा’ अभियानामध्ये एस्.टी. महामंडळाचे सर्व आगार आणि बसस्थानके यांवरील ध्वनीक्षेपकावरून धून आणि ध्वजगीत वाजवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर तिरंगा ध्वज फडकवण्यात येणार आहे. महामंडळाचे ९० सहस्र अधिकारी-कर्मचारी यांना त्यांच्या घरावर तिरंगा फडकावण्याच्या सूचना देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. १३ ते १५ ऑगस्ट या काळात सर्व प्रमुख बसस्थानकांवर विद्युत् रोषणाई करण्यात येणार आहे. रांगोळी काढून सर्व बसस्थानके सजवण्यात येत आहेत. उत्सवाचे निमित्त साधून ९ ते १६ ऑगस्ट या कालावधीत राज्य परिवहन मंडळामध्ये ‘स्वच्छता सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सामूहिक प्रयत्नांतून बसस्थानके स्वच्छतागृहे आणि बस यांची स्वच्छता करण्यात येणार आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > ‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी एस्.टी. महामंडळ सज्ज
‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी एस्.टी. महामंडळ सज्ज
नूतन लेख
पुणे विद्यापिठामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनास विद्यापिठाचा विरोध !
विधानसभेत २१ वर्षांत विविध मंत्र्यांनी दिलेली २ सहस्र ६३६ आश्वासने प्रलंबित !
कोकणातील गणेशोत्सवासाठी ९१७ बस पाठवल्याने मराठवाड्यातील प्रवाशांचे हाल !
सोलापूर येथे छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार्या भक्ताची पोलिसांकडून अडवणूक !
कुंकळ्ळी (गोवा) येथील विनयभंग प्रकरणी शारीरिक शिक्षकाच्या बडतर्फीची शिफारस
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी परिसरातील शाळा दत्तक घेणार ! – विष्णु मोंडकर, अध्यक्ष, गाबीत फिशरमेन फेडरेशन