मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी केला अल्पवयीन हिंदु मुलीचा विनयभंग

उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ची आणखी एक घटना उघड !

पोलिसांसमवेत आरोपी

मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील शाहबुद्दीनपूर गावात ‘लव्ह जिहाद’ची एक घटना समोर आली आहे. या गावातील अय्यान नावाच्या मुसलमान तरुणाने ११वीच्या वर्गात शिकणार्‍या एका अल्पवयीन हिंदु मुलीशी ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक संकेतस्थळाद्वारे जवळीक केली. अय्यान याने तिला फसवून गावातील एका निर्जन घरी नेले. तेथे अय्यान आणि त्याचे इतर २ साथीदार कैप आणि अमन यांनी पीडित मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांनी मुलीची सुटका केली. लोकांनी तिन्ही आरोपींना पकडून त्यांना पुष्कळ मारहाण केली आणि नंतर त्यांना पोलिसांकडे सोपवले.

या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणाची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषदेचे नगर अध्यक्ष विकास अग्रवाल यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली. ‘अल्पवयीन हिंदु मुलीसमवेत घडलेली ही घटना पुष्कळ गंभीर असून सरकारने या प्रकरणाची कसून चौकशी करावी’, अशी मागणी विकास अग्रवाल यांनी या वेळी केली.

पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांची कारावासात रवानगी केली आहे. पोलिसांनी पीडित मुलीला तिच्या कुटुंबियांकडे सुपुर्द केले. ‘या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे’, असे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • धर्मांधांनी मैत्रीचे कितीही नाटक केले, तरी त्याचा शेवट हिंदु युवतीच्या फसवणुकीनेच होतो, हे ठरलेले आहे !
  • सामाजिक संकेतस्थळांच्या अतीवापरामुळे अनेक युवतींना अशा कठीण प्रसंगांचा सामना करावा लागलेला असूनही त्यातून काहीही न शिकणार्‍या हिंदु युवतींचे प्रबोधन करणे आवश्यक !
  • या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक !