१. ‘आश्रम पाहून माझ्या मनाला पुष्कळ आनंद झाला. ‘येथे पुनःपुन्हा यावे’, असे मला वाटले. येथे मला चैतन्य मिळाले. आश्रमाविषयी सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.’ – श्री. पंडित म. कराडे (शिवसेना व्यापार सेना, मिरज शहर प्रमुख), मिरज (१४.६.२०२२)
२. ‘आश्रमातील सात्त्विकता पुष्कळ वाढली आहे. येथील वातावरणात मला हलकेपणा जाणवला. आश्रम पहातांना प्रत्येक ठिकाणी माझा भाव जागृत होत होता.’ – सौ. सुवर्णा पंडित कराडे, सांगलीकर मळा, मिरज. (१४.६.२०२२)
३. ‘मी पहिल्यांदाच आश्रमात आले आहे, तरी येथून निघण्याची माझी इच्छा होत नव्हती; पण मी पुन्हा आश्रमात सेवा करण्याची संधी मिळवीन.’ – सौ. मेघा निरंजन चौधरी, जळगाव (१५.६.२०२२)
४. ‘आश्रम पाहून माझी नकारात्मकता न्यून झाल्याची आणि सत्त्वगुणात वाढ झाल्याची मला अनुभूती आली. ‘आश्रमाचे नियोजन, साधकांची सात्त्विकता आणि निरपेक्ष प्रेम’ इत्यादी पाहून मला आनंद झाला.’ – श्री. कमलेश उल्हास बांदेकर, डिचोली, गोवा. (१५.६.२०२२)
५. ‘एवढे मोठे कार्य इतक्या सहजपणे चालत आहे’, हे पाहून मी आश्चर्यचकित झालो. ‘तुमचे हे ईश्वरी कार्य चांगले चालू रहावे’, अशी ईश्वराला प्रार्थना !’ – श्री. कृष्णराव बा. बांदोडकर, वास्को, गोवा. (१५.६.२०२२)
६. ‘आश्रमात पूर्वीच्या तुलनेत आता ईश्वरी चैतन्यात वाढ झाल्याचे जाणवले. आश्रम पहातांना मला प्रत्येक पावलागणिक चैतन्य जाणवले.’ – श्री. उमेश मधुकर सोनार (व्यावसायिक), जळगाव (१७.६.२०२२)
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून दिलेले अभिप्राय
१. ‘प्रदर्शन पाहिल्यावर मला सूक्ष्म जगताविषयी, तसेच ‘नकारात्मक शक्ती काय करतात ?’, हे कळले आणि त्यांच्यावरील प्रतिबंधात्मक उपायही कळले.’ – श्री. लखन दिलीप जाधव (प्रधान आचार्य, सव्यसाची गुरुकुलं), जिल्हा कोल्हापूर (१७.६.२०२२)
२. ‘प्रदर्शन पाहून मला सात्त्विक शक्तींची महती पटली.’ – अधिवक्ता संजय पुंडलिक पाटील, पाचगाव, करवीर, जिल्हा कोल्हापूर. (१७.६.२०२२)
३. ‘आपण सूक्ष्म जगताच्या संदर्भातील अनुभूती घेतलेल्या असतात; पण आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून त्यामागची कारणमीमांसा कळण्यास साहाय्य झाले.’ – श्री. सचिन गणेश कुलकर्णी, रंकाळा, कोल्हापूर. (१७.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |