नागपूर येथे ‘इन्स्टंट लोन’ फसवणूक केल्याप्रकरणी २ धर्मांधांना अटक !

ॲपचा संबंध चीनसमवेत असल्याचे उघड

नागपूर – येथील ‘इन्स्टंट लोन ॲप’चा संबंध थेट चीनसमवेत असल्याचा खुलासा येथील पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांनी केला आहे. या प्रकरणात चीनचा हॅकर दोघा आरोपींना किती जणांची फसवणूक करायची, याची सूची पाठवत होता, हे अन्वेषणातून समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कैफ इब्राहिम सय्यद (वय २५ वर्षे) आणि ईरशाद ईस्माईल शेख (वय ३२ वर्षे) यांना अटक केली आहे. त्यांनी वसूल रकमेच्या ३ टक्के ‘कमिशन’वर काम करत असल्याचे सांगितले आहे.

१. आरोपींकडे येत असलेले ‘व्हॉट्सॲप’ क्रमांक हे हाँगकाँग, चीन, दुबई आणि फिलिपिन्स येथील असल्याचे उघड झाल्याने या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अजनी पोलीस ठाण्यातील ठाणेदार दुर्गे यांनी दिली.

२. चिनी हॅकर आरोपींना पाठवत असलेल्या सूचीत २५ जणांची नावे असायची. हे पैसे चीनच्या सायबर गुन्हेगाराला पाठवण्यासाठी आरोपी ‘बायनान्स’ या ॲपचा उपयोग करत होते. ‘ॲप’द्वारे भारतीय चलन ‘क्रिप्टो करन्सी’त पालटते. या दोघांच्या खात्यात ५० लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे.

३. शहरातील २० वर्षीय तरुणीने ‘ऑनलाईन’ कर्ज मिळवण्यासाठी भ्रमणभाषद्वारे ‘ॲप’वर अर्ज भरला होता; मात्र काही दिवसांतच तिचे अश्लील छायाचित्र संकेतस्थळावर टाकण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे उकळण्यात आले. ते पैसे थेट चीनमधील एका बँक खात्यात गेल्यामुळे गोंधळ झाला; मात्र पोलिसांनी चीनपर्यंत पैसे पोचवणार्‍या वरील २ आरोपींना अटक केली.

संपादकीय भूमिका

आतापर्यंत धर्मांधांनी फसवणूक करून उकळलेली रक्कम त्यांच्याकडूनच वसूल करायला हवी !