श्री. श्रीराम लुकतुके, श्री. प्रदीप वाडकर आणि ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निरंजन चोडणकर यांची पुणे येथील श्री. शशांक सोनवणे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम लुकतुके, श्री. प्रदीप वाडकर आणि ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निरंजन चोडणकर यांची पुणे येथील श्री. शशांक सोनवणे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

श्री. श्रीराम लुकतुके, देहली

श्री. श्रीराम लुकतुके

‘हरिद्वार येथील कुंभेमळ्याच्या वेळी मला देहली येथील श्री. श्रीराम लुकतुके यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. शांत

श्रीरामदादांचा स्वभाव अतिशय शांत आणि स्थिर आहे. दादा भ्रमणभाषवर अतिशय शांतपणे बोलतात.

श्री. शशांक सोनवणे

२. प्रेमळ

दादांकडे धर्मप्रेमींच्या निवासव्यवस्थेची सेवा होती. या सेवेच्या अंतर्गत कुणी धर्मप्रेमी रुग्णाईत झाले असतील, त्यांना काय हवे-नको, ते पाहून दादा त्यांना ते वेळेत देण्याचा प्रयत्न करत असत.

३. त्यांचा प्रत्येक कृती सात्त्विक पद्धतीने करण्याचा प्रयत्न असतो.

४. ‘भोजनात कोणते पदार्थ प्राधान्याने संपवणे अपेक्षित आहेत ? कोणते पदार्थ टिकतील ?’, याकडे त्यांचे लक्ष असायचे.

५. अष्टावधानी

श्रीरामदादा एकाच वेळी अनेक सेवा अगदी सहजपणे करतात. ते भ्रमणभाषवर बोलत असतांना भोजनकक्षात एखादा पदार्थ बनवणे किंवा एखादी सेवा करणे, अशा गोष्टी अगदी सहजपणे करतात. एका धर्मप्रेमीने ‘श्रीरामदादा अष्टावधानी आहेत’, असे सांगून त्यांचे कौतुक केले होते.’

– श्री. शशांक सोनवणे, सिंहगड रस्ता, पुणे. (२६.४.२०२१) ०

श्री. प्रदीप वाडकर

श्री. प्रदीप वाडकर

‘एकदा मला श्री. प्रदीप वाडकर यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. श्री. प्रदीपदादा अल्प कालावधीत कार्यकर्त्यांशी जवळीक साधतात.

२. ते कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवून त्यांना साधनेचे प्रयत्न करण्यासाठी दिशा देतात.

३. सेवेची तीव्र तळमळ

दादा सोशल मिडियाची सेवा आणि प्रासंगिक अशा अनेक सेवा करत असतात. ‘ते या सर्व सेवा कशा करतात ?’, याचे मला फार आश्चर्य वाटत असे. ते रात्री संगणकीय सेवा करूनही सकाळी पुढील सेवेसाठी सिद्ध असायचे. ‘दादांची सेवा करण्याची क्षमता फारच चांगली आहे’, असे पुष्कळ कार्यकर्त्यांना जाणवले.

४. दादा कोणत्याही गोष्टीचे श्रेय त्वरित समोरच्या कार्यकर्त्यांना देतात.’

– श्री. शशांक सोनवणे, सिंहगड रस्ता, पुणे. (२६.४.२०२१) ०

श्री. निरंजन चोडणकर, मये, गोवा.

श्री. निरंजन चोडणकर

‘हरिद्वार येथील कुंभेमळ्याच्या वेळी मला हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. आनंदी

श्री. निरंजनदादा सतत हसत-खेळत राहून इतरांनाही आनंदी ठेवतात.

२. प्रेमभाव

ते प्रत्येक कार्यकर्त्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. ते युवा कार्यकर्त्यांना अतिशय प्रेमाने जवळ घेऊन त्यांची अनौपचारिक विचारपूस करतात. ते इतर कार्यकर्त्यांच्या सेवा व्यवस्थित समजून घेऊन त्यांना योग्य तो प्रतिसाद देतात.

३. साधनेत साहाय्य करणे

अ. त्यांनी ‘प्रदर्शनाच्या ठिकाणी सेवा करतांना भाव कसा ठेवायचा ?’, याविषयी काही उदाहरणे सांगून मला दिशा दिली.

आ. त्यांनी ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचा साधनेत कसा लाभ झाला ?’, हे सांगून ‘प्रक्रिया राबवणे किती आवश्यक आहे ?’, याचे महत्त्व आमच्या मनावर बिंबवले.

इ. त्यांनी आम्हाला त्यांच्या साधनेतील अनुभव उत्स्फूर्तपणे सांगितले.

४. दादा कार्यकर्त्यांना सेवेच्या ठिकाणी वाहनाने ने-आण करण्याच्या सेवेचा समन्वय अतिशय भावपूर्ण आणि परिपूर्ण करत असत.

५. दादांच्या हसण्याच्या आवाजातही चांगली स्पंदने जाणवतात.’

– श्री. शशांक सोनवणे, सिंहगड रस्ता, पुणे. (२६.४.२०२१)