रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. रामनाथी आश्रमाची अनुभवलेली वैशिष्ट्ये !

अ. ‘आश्रमात सर्वत्र सकारात्मक ऊर्जा आहे.

आ. येथील साधक सात्त्विक, धार्मिक आणि पुष्कळ नम्र आहेत.

इ. येथे सर्वकाही चांगले आहे.

ई. मला आश्रमात शांती अनुभवता आली.’

– श्री. मंजुनाथ बसवनगौडा (प्रदेशाध्यक्ष, बजरंग सेना), मंड्या, कर्नाटक.


२. ‘आश्रम पहाणे, हा माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता.  सध्याच्या स्थितीत सनातन धर्मप्रसाराचे कार्य अपरिहार्य आहे. ते कार्य वृद्धींगत करण्याचे महान कार्य आश्रमात चालू आहे. मला येथे येऊन धन्य वाटले.’

– डॉ. लक्ष्मीश सोंदा (इतिहासक), शिरसी, कर्नाटक.