सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून हत्येतील संशयित पसार !

कारागृहातील सुरक्षायंत्रणेचे तीन-तेरा !

सांगली – जिल्हा मध्यवर्ती कारागृहात हत्येच्या प्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आलेला आरोपी सुनील ज्ञानेश्वर राठोड हा ३१ जुलै या दिवशी सकाळी ७ वाजता वैरण अड्डा येथील भिंतीवरून उडी मारून पसार झाला आहे. याविषयी कारागृह प्रशासनाने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. बंदीवान पसार झाल्यामुळे कारागृहाच्या सुरक्षायंत्रणेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक कर्नाटककडे रवाना झाले आहे.