‘मुंबै बँके’चे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे अचानक त्यागपत्रे !

मुंबई – राज्यात सत्तापालट होऊन भाजपप्रणीत सरकार स्थापन होताच मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (‘मुंबै बँके’चे) अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि उपाध्यक्ष विठ्ठल भोसले यांनी अचानक पदांची त्यागपत्रे दिली आहेत. या पदांसाठी ५ ऑगस्ट या दिवशी होणार्‍या संचालक मंडळाच्या बैठकीत निवड होणार आहे. मुंबै बँकेत २१ संचालक आहेत. आमदार प्रवीण दरेकर मजूर प्रवर्गातून अपात्र ठरल्याने सध्या २० संचालक आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे  १० अन् भाजप यांचे १० अशी संख्या आहे. भाजपची सत्ता असल्याने भाजपचा अध्यक्ष बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.