संजय राऊत यांच्यावर स्वप्ना पाटकर यांना धमकी दिल्याचा गुन्हा नोंद होणार  ! – किरीट सोमय्या, भाजप नेते

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर स्वप्ना पाटकर यांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात येणार आहे, असे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले. या प्रकरणी सोमय्या यांनी ३१ जुलै या दिवशी वाकोला पोलिसांची भेट घेतली होती. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जिवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार स्वप्ना पाटकर यांनी वाकोला पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना धमकी आणि शिवीगाळ दिल्याविषयीची एक ध्वनीफीत प्रसारित झाली होती. यातील आवाज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा असल्याची चर्चा होती. या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी चालू आहे. याच प्रकरणी सोमय्या यांनी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. स्वप्ना पाटकर यांना सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याची माहिती सोमय्यांनी दिली.