सांगली – वर्ष १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेला रणगाडा सांगलीत आणण्यात आला आहे. रंगरंगोटी करून तो प्रतापसिंह उद्यानात बसवला जाणार आहे. उद्यानात शिवसृष्टीही साकारली जाईल. सांगलीतील प्रतापसिंह उद्यानाला ऊर्जितावस्था देण्याच्या दृष्टीने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी अन् महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. १५ ऑगस्टच्या आसपास हा रणगाडा नागरिकांना पहाण्यासाठी खुला केला जाणार आहे.