पुणे – ‘गो नॉईज’ या घड्याळ आस्थापनाकडून बोलत आहे. आस्थापनाची ऑफर चालू आहे. तुम्ही ५ सहस्र रुपये भरल्यास तुम्हाला १ भ्रमणसंगणक (लॅपटॉप) विनामूल्य मिळेल, असे सांगून एका तरुणाला १ लाख ३४ सहस्र रुपयांना फसवले. (अल्प दरात महागड्या वस्तू विकत मिळतील, हा मोह टाळणे किती आवश्यक आहे, हे लक्षात आणून देणारी घटना ! – संपादक)
पैसे भरण्याविषयी तरुणाला पे.टी.एम्. आणि आयसीआयसीआय बँकेच्या ॲपद्वारे प्रक्रिया करण्यास सांगितले होते. उंड्री येथील या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पुढील अन्वेषण करत आहेत.