फोंडा (गोवा) – केसरिया हिंदु वाहिनीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोव्यातील श्री. राजीव झा यांना सलीम शेख या धर्मांधाकडून फेसबूकवर धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार फोंडा पोलीस ठाण्यात २६ जुलै या दिवशी केली होती. असे असूनही २७ जुलैला ‘गोवा २४X७’ या वृत्तवाहिनीवरील वृत्तानुसार शेख याने मला मारण्यासाठी पुन्हा लोकांना चिथावणी दिली आहे, असे श्री. राजीव झा यांनी २७ जुलैला फोंडा पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्याचप्रमाणे या घटनेचा संबंध पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेशी असून या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. फोंडा पोलीस निरीक्षक श्री. विजयकुमार चोडणकर यांना निवेदन देतांना श्री. राजीव झा, श्री. संतोष राजपूत, श्री. अविनाश तिवारी, श्री. सत्यविजय नाईक, श्री. सुभाष सिंह, श्री. सज्जन जुवेकर आणि अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,
देशभरातील सध्याच्या परिस्थितीनुसार सामाजिक माध्यमांचा वापर देशातील एका विशिष्ट समाजातील लोकांची हत्या करण्यासाठी चिथावणी देण्यासाठी केला जात आहे. राजस्थानी येथील कन्हैयालाल, मध्यप्रदेशमधील निशांत राठोड आणि काल २६ जुलैला कर्नाटमधील प्रवीण नेट्टारू यांची हत्या ही याचीच परिणती आहे. नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणी जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) आणि ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ यांच्या २१ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व घटनांत ‘पी.एफ्.आय.’ या जिहादी संघटनेचा संबंध प्रत्येक ठिकाणी दिसून येतो. नुकताच होंडा येथील पेट्रोल पंपावरील हिंदु कर्मचार्यावर धर्मांधांनी आक्रमण केले. या घटनेतही ‘पी.एफ्.आय.’ या जिहादी संघटनेचा संबंध आहे का ? याचे कसून अन्वेषण करावे. गोव्यातील शांती आणि धार्मिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी ‘पी.एफ्.आय.’ या जिहादी संघटनेवर बंदी घालावी.