जाहिद आणि अरमान यांनी नात आणि सूनबाई यांचे अपहरण केल्याचे सांगत वृद्ध हिंदूची साहाय्य करण्याची याचना !

बेगुसराय (बिहार) येथील घटना

बेगुसराय (बिहार) – येथील डुमरी भागात एका असाहाय्य वृद्ध हिंदु व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्तीने, ‘परिसरात बहुसंख्येने असलेले मुसलमान माझ्या कुटुंबावर बर्‍याच काळापासून इस्लाम पंथ स्वीकारण्यासाठी दबाव आणत होते. परिसरातील धर्मांध माझ्या कुटुंबियांना धमक्या देत आहेत. आता जाहिद आणि अरमान या धर्मांधांनी माझी नात आणि सूनबाई यांचे अपहरण केले आहे’, असा आरोप केला आहे. या व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्तीने साहाय्यासाठी याचना केली आहे. विश्‍व हिंदु परिषदेच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने हा व्हिडिओ प्रसारित करत, ‘बिहार राज्य जिहाद्यांसाठी नंदनवन बनले असून हिंदूंसाठी नरक बनला आहे’, अशी टीका केली आहे.

या प्रकरणी वृद्ध व्यक्तीच्या मुलाने डुमरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ‘धर्मांधांनी माझी पत्नी आणि बहीण यांच्याशी बळजोरीने लैंगिक संबंध ठेवल्याचा प्रयत्न केला’, असा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे. बिहारच्या बेगुसराय येथे यापूर्वीही हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.

संपादकीय भूमिका

बिहार भारतात आहे कि पाकिस्तानात ?