भरतपूर (राजस्थान) येथील अवैध उत्खननाच्या विरोधात आत्मदहन करणारे संत विजय दास यांचे निधन

संत विजय दास (उजवीकडे)

भरतपूर (राजस्थान) – येथील आदिबद्री धाम आणि कनकाचल भागात अवैध उत्खननाच्या प्रकरणी साधू, संत आणि गावकरी यांनी ५५० दिवस आंदोलन केल्यानंतर सरकारने या क्षेत्राला ‘वनक्षेत्र’ घोषित करण्याचे आश्‍वासन दिले आहे. तथापि याच्या एक दिवस आधी आंदोलनाच्या वेळी ६५ वर्षीय विजय दास या संतांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ते ८० टक्के भाजले होते. अंततः २३ जुलै या दिवशी त्यांचे देहली येथील रुग्णालयात उपचार चालू असतांना निधन झाले. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

संतांच्या मृत्यूला राजस्थानमधील काँग्रेस सरकारच उत्तरदायी आहे. त्याने कितीही कठोर प्रायश्‍चित्त घेतले, तरी ते अल्पच आहे. आता जनतेनेच काँग्रेस सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे !